आबारनाथ (प्रतिनिधी) :- मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 'पाठशाळा एक्सचेंज' या अनोख्या कार्यक्रमाला उच्च विद्या विभूषित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 'नारी सफाई साथी' महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठी विज्ञान परिषद अंबरनाथ विभाग अध्यक्ष प्रा. भगवान चक्रदेव याच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम बाळवाडी भागना मडळ सभागृहात अलीकडेच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सौ. शोभा चक्रदेव यांनी भूषविले. युनायटेड नशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत 'पाठशाळा एक्सचेज' हा अनोखा कार्यक्रम करण्यात आला. यात सुशिक्षित महिलांकडून अशिक्षित अर्थात कचरा वेचक महिला ज्यांना 'नरी सफाई साथी' म्हटले जाते अशांना सुशिक्षित महिला या महिलांना आपल्याकडील ज्ञानमाहिती देत असतात. आणि या शिक्षित कचरा वेचक महिला कचरा वेचताना येणारे अनुभव या महिलांना सांगतात. कचरा अनुभव वेचक महिलांकडे असलेलं ज्ञान ऐकून सुशिक्षित महिलांनी त्यांचे विशेष कौतक केले. या कचरा वेचक महिलांकडे विशेष करून प्लास्टिक च्या बाबतीत असलेल्या अनुभवाचा प्लास्टिक विघटनाबाबतीत चांगला उपयोग होईल असा विश्वास डॉ. मनीषा कर्पे यांनी व्यक्त केला. 'नारी सफाई साथी' यांच्या सोबत ससंवाद घडवून आणला. लक्ष्मी गोरे, पूनम गवळी. रेहमन शेख या 'नरी सफाई साथी' प्रतिनिधींचा यावेळी सौ. शोभा चक्रदेव यावेळी सौ. शोभा चक्रदेव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सुखदेव सोनावणे या सफाई कर्मचाऱ्याने यावेळी नारी शक्तीवर स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची शक्तवाव्यत्व यवतलाकविरी वाहवा मिळवली. सौ. शोभा चक्रदेव यांचा सत्कार सुनयना कालेकर व डॉमनिषा कर्पे यांच्या हस्ते करण्यात आला. सुधा सोमणी यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. या वर्षीच्या थीम विषयी माहिती दिली. डॉमनिषा कर्पे यांनी होळी पर्यावरण, सौ. मनिषा पूर्भे यांनी ११ भारतीय महिला शास्त्रज्ञांच्या नावे नवीन स्थापित जागां विषयी सांगितले. मधुरा जोशी यांनी आधनिक काळातही महिलांना कराव्या लागणाः कराव्या लागणाऱ्या तडजोडी उदाहरणासह उपस्थितांपर्यंत पहोचविल्या. सधा सोमणी यांनी भारताचे मंगळयान मंगळापर्यंत पोहोविवणाऱ्या इस्रो च्या महिला शास्त्रज्ञ भगवायत्ते पहाबवणान्या पासून अंटार्टिका मोहिमेत सहभागी झालेल्या दोघी महिला शास्त्रज्ञांविषयी सांगितलं. सुनयना कालेकर, मधुरा आठल्ये यांनी पुरुष प्रधान क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणाऱ्या प्रवासाविषयी वर्णन केलं. कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे 'नारी सफाई साथी' यांनी सादर केलेले मनोगत व त्यांच्या पुरुष साथीदारांनी कविता सादर केली. प्रियांका वाळंज यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या विकास कार्यक्रमाविषयी व कोका कोला यांचा संयुक्त प्रकल्प 'पृथ्वी' यात अंबरनाथ शहराची झालेली निवड या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधा सोमणी यांनी केले. सूत्रसंचालक सुर्यवसामो
'नारी सफाई साथी'च्या सहवासात महिला दिन संपन्न