मुंबई:अख्ख्या जगासमोर आरोग्यविषयक आव्हान उभे करणाऱ्या करोना विषाणूशी सर्वच पातळ्यांवर लढा सुरू असताना, अगदी आवश्यक कारणांसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागलेच, तर त्यांनी घरी तयार केलेला मास्क अवश्य वापरावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. करोनाशी लढत असलेले केंद्र सरकार त्यासाठी विविध पातळ्यांवर पावले टाकत आहे. प्रत्यक्ष उपायांसोबतच नागरिकांनी पाळावयाच्या सूचनाही सरकार वेळोवेळी देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरगुती मास्कवापराच्या सूचना केंद्राने जारी केल्या आहेत. सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छता यामुळे करोनाला दर ठेवणे शक्य होऊ शकेल, याची आम्हाला जाणीव आहे. घरी तयार केलेल्या मास्कचा वापर त्यास बलदायी ठरू शकतो, असा दावा काही देशांनी केला आहे. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य सुरक्षेसाठी हा चांगला पर्याय असू शकेल, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे. __स्वत:च्या आरोग्य सुरक्षेसाठी घरच्या घरी मास्क तयार करणे सोपे आहे. एखादा जुना टीशर्ट किंवा ओढणीचा वापरही मास्क म्हणून करता येईलत्यामुळे नागरिक सुरक्षित राहतीलच, आणि सोबत भोवती वावरणाऱ्यांचेही संरक्षण होईल. अर्थात, या घरगुती मास्कची स्वच्छताही महत्त्वाची आहे. जगभरातील त्या त्या देशांच्या सरकारने तेथील नागरिकांना वैद्यकीय वापराच्या मास्कचा साठा करू नका, अशी विनंती केली आहे. या मास्कची उपलब्धता मर्यादित असल्याने त्याची सर्वाधिक गरज ही आरोग्य क्षेत्रात दिवसरात्र काम करणारी मंडळी, रुग्ण आणि इतर जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना आहे. केंद्र सरकारने शनिवारी जारी केलेल्या सूचनेनुसार हे मास्क दसऱ्यांना वापरण्यास देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, दोन मास्क तयार करावेत, त्यामुळे एक धुतल्यास दुसरा उपलब्ध असू शकेल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, मास्कची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच, मास्क घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुतलेले असावेत, असा आग्रह धरला आहे. मास्क नीटनेटके ठेवा, कुठेही टाकू नका, साबण आणि गरम पाण्याने स्वच्छ धुवा, असा सल्ला दिला आहे. दुकाने पाच आरोग्य कर्मचारी, रुग्णांसाठी लागू नाही सामान्यपणे घराबाहेर पडताना आरोग्याशी संबंधित कोणत्याही तक्रारी नसलेल्यांसाठी किंवा श्वास घेण्यास त्रास होत नसलेल्यांसाठी घरगुती मास्कचा पर्याय उपयुक्त ठरू शकेल. मात्रआरोग्यसेवक किंवा करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांसाठी मास्कचा वापर उपयुक्त ठरू शकणार नाही.
घरगुती मास्क वापरा; करोनाला दर ठेवा!